कोणत्याही निवासाचे मुख्य प्रवेश द्वार हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांना घराचे मुख्य द्वार ओलांडून आत येण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे. बहुतांश नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा येथेच जमा होते आणि म्हणून निवासाच्या ह्या भागाची जास्तीत जास्त काळजी घेऊन देखभाल केली पाहिजे. तुमच्या घरात हितस्वास्थ्य व समृध्दी कायम ठेवण्यासाठी तुमचे मुख्य द्वार सर्वोत्तम दिशेत स्थित असणे आवश्यक आहे. जर ही दिशा चुकीची असेल तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो आणि त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून घर खरेदी करताना किंवा त्याला भाड्याने देण्याआधी, कुटुंबाच्या कमावत्या कर्त्या व्यक्तीची किंवा घराच्या मालकाची अनुकूल दिशा ही मुख्य द्वाराच्या दिशेला समांतर असली पाहिजे याची खात्री करावी. मुख्य प्रवेश द्वाराची दिशा कुटुंबाला प्रभावित करते जी कुटुंबाच्या कमावत्या व्यक्तीच्या चार अनुकूल व चार प्रतिकूल दिशांवर अवलंबून असते.

उत्तर मुखी घराचे मुख्य प्रवेश द्वार -
पोषणकर्त्याच्या अनुकूल दिशा -
  • १ ली ( प्रथम ) अनुकूल दिशा –

प्रथम अनुकूल दिशेचा सामना करणारे मुख्य द्वार ही एक आदर्श स्थिती आहे. यामुळे व्यक्तीला त्याच्या कारकीर्दीमध्ये तसेच व्यवसायात यश प्राप्त होऊ शकते, पदोन्नती होण्याच्या शक्यतांमध्ये वाढ होऊ शकते आणि आर्थिक स्थितीमध्ये स्थैर्य येऊन वाढ होते. शिक्षण, एकाग्रतेची पातळी आणि मुलांच्या ज्ञानामध्ये सुधारणा होऊ शकते. पती आणि पत्नीच्या संबंध तसेच कुटुंबातील सामान्य नातेसंबंध सुध्दा चांगले होऊ शकतात. व्यक्तीला जीवनामध्ये नाव आणि प्रसिध्दी प्राप्त करण्यास मदत होते. हे अगदी खरे आहे की जे उत्तर मुखी घर असेल ते एकापेक्षा अधिक प्रकारे फायदेशीर असल्याचे दर्शविते.

  • २ री ( दुसरी ) अनुकूल दिशा –

दुसऱ्या अनुकूल दिशेतील व्यक्ती आपले पारिवारिक सहजीवन आनंदात व्यतित करतात. त्यांचा अथवा तिचा कारकीर्दीमध्ये नियमितपणे विकास होतो. कमीत कमी अपघात होण्याच्या धोक्यांसह संपूर्ण कुटुंबावर चांगल्या आरोग्याचा आशिर्वाद असतो. कोणतेही कायदेशीर खटल्यांचे निर्णय त्यांच्या बाजूने लागतात.

  • ३ री ( तीसरी ) अनुकूल दिशा –

तिसऱ्या अनुकूल दिशेमुळे व्यक्तीचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि परिपूर्ण होईल. त्यांना आपल्या कुटुंबाची तसेच मित्रांची चांगली साथ मिळेल. व्यवसायात वाढ करण्यासाठी व्यावसायिकांकडून त्यांना चांगले तसेच त्वरीत समर्थन प्राप्त होईल. वास्तु अनुसार आगीमुळे होणारे अपघात तसेच चोरांपासून रहिवासी त्रस्त होणार नाहीत. नैसर्गिक रित्या योग्य उत्तर मुखी घराची योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे.

  • ४ थी ( चौथी ) अनुकूल दिशा –

आपल्या चौथ्या अनुकूल दिशेचा सामना करणाऱ्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना नेहमी नशीबाची साथ मिळते. कोणत्याही प्रलंबित कायदेशीर खटले जलद गतीने आणि कमी खर्चात सोडविले जातात. या घरांमध्ये हातात घेतलेले कोणतेही कार्य विना अडथळा पूर्ण होऊ शकते. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे होत नाहीत आणि कुटुंबातील सदस्यांचा कोणत्याही प्रकारचे अपघात होत नाहीत.

जरी प्रत्येक अनुकूल दिशांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात तरीही उत्तर दिशेचा सामना करणाऱ्या घराला वास्तु अनुरूप बनविणे महत्त्वपूर्ण असते कारण जीवनामध्ये कोणत्याही एका प्रकारच्या गोष्टीमध्ये आलेल्या समस्यांमुळे दुसऱ्या अजून इतर समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, जर कुटुंबामध्ये नियमितपणे पैसे येत असतील आणि कुटुंब आर्थिक रित्या स्थिर असेल पण कुटुंबातील सदस्यांमधील प्रत्येक व्यक्तीला जर सतत आरोग्याविषयीच्या समस्या भेडसावत असतील तर कमाविलेले सगळे पैसे वैद्यकीय बिलांमध्ये खर्च केले जातील. याचा अर्थ असा आहे की, त्यांच्या आर्थिक गळतीला थांबविण्यासाठी ते सक्षम नाहीत त्यामुळे अप्रत्यक्षपणे कुटुंबाचे संपूर्ण कुशल मंगल होण्यावर आणि आनंदावर प्रभाव पडतो.

घरातील कमविणाऱ्या कर्त्या व्यक्तीची प्रतिकूल दिशा -
  • १ ली ( प्रथम ) प्रतिकूल दिशा –

प्रथम प्रतिकूल दिशेचा सामना करणाऱ्या या विशिष्ट घरात राहण्यामुळे बऱ्याच समस्यांचा सामोरे जावे लागेल. व्यक्तीचे आर्थिक स्थैर्य होणार नाही आणि कार्यालय व व्यवसायामध्ये समस्या येतील. पती आणि पत्नी यांच्या संबंधामध्ये समस्या निर्माण होतील. मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये संघर्ष करावा लागेल. म्हणजेच एकंदर, कुटुंबातून आनंद आणि सुख निसटून जाईल.

  • २ री ( दुसरी ) प्रतिकूल दिशा –

व्यक्तीला कार्यालय तसेच घर या दोन्ही ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागते. कुटुंबाच्या आरोग्या संबंधित समस्यांबरोबरच जास्तीत जास्त अपघात होण्याच्या शक्यता असतात. कायदेशीर खटले हरण्याच्या शक्यता जास्त असतात त्यामुळे उत्तर मुखी घराची निवड करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते.

  • ३ री ( तिसरी ) प्रतिकूल दिशा –

तिसऱ्या प्रतिकूल दिशेचा सामना करणाऱ्या या विशिष्ट घरात राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरात समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांचा व्यवसायात व कामामध्ये मदत मिळविण्याचा आनंद ते घेऊ शकत नाहीत. आगीच्या संबंधित अपघात होणे तसेच चोरी होण्याची शक्यता जास्त असते.

  • ४ थी ( चौथी ) प्रतिकूल दिशा –

चौथ्या प्रतिकूल दिशेला सामोरे जाणाऱ्या घरात राहणाऱ्या लोकांच्या घरात नेहमी भांडणे होतात तसेच दुर्देवाने सर्व काही बिघडून जाते. रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे कार्य पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांचे लक्ष्य प्राप्त करणे अवघड जाते. कायदेशीर अडचणी दिवसेंदिवस वाढत जाऊन हाताबाहेर जातात. म्हणून उत्तर मुखी घरामध्ये राहणे गरजेचे आहे.