जीवन समस्या मुक्त ग्राम योजना
shri-guruji-social-work

मानव जातीच्या कल्याणासाठी डॉ. श्री.चंद्रशेखर गुरुजी यांनी जीवनसमस्यामुक्त ग्राम योजना हा महा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे. ‘जीवनसमस्यामुक्त ग्राम योजना’ या कार्यक्रमाअंतर्गत सी जी परिवाराने गावे दत्तक घेतली आहेत आणि गावातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या घरासाठी ‘सरळ वास्तु’ देण्यात येईल. ग्रामस्थांना त्यांचे आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती आणि समृद्धी आणि जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘सरळ वास्तु’ मदत करील. हा सामाजिक प्रकल्प सर्व गावकऱ्यांसाठी ‘पूर्णपणे मोफत’ आहे. गोडची हे सी जी परिवाराने ‘जीवनसमस्यामुक्त ग्राम योजना’ या कार्यक्रमाअंतर्गत दत्तक घेतलेले पहिले गाव आहे. गोडची मधील स्थानिक विधानसभा परिषद सदस्य श्री. नागराज चौबे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. गुरुजी ‘सरळ वास्तु’ चा लाभ देण्यासाठी तुलनेने चांगल्या ठिकाणच्या दुसऱ्या गावाची निवड करू शकले असते पण त्यांनी या वंचित आणि गरीब गावाची निवड केली असे त्यांनी सांगितले. त्यांनी असाही उल्लेख केला की ‘सरळ वास्तु’ चा लाभ देणे आणि जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामस्थांना मदत करणे हाच गुरुजींचा प्रामाणिक हेतू आहे. प्रत्येक घरासाठी वास्तु सल्ला देण्यासाठी सरळ वास्तुच्या वास्तु तज्ञांची गावात नेमणूक करण्यात आली आहे.

जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करणे हेच सी जी परिवाराचे प्रमुख ध्येय आहे. सी जी परिवार ने गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी हुबळी-धारवाड रस्त्यावर १४ एकर जमीन घेतली आहे. पूर्ण झाल्यानंतर या सुविधेमुळे प्रत्येक वर्षी १००००हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण दिले जाईल.

गुरुजींनी ‘शिक्षण समस्यामुक्त योजना’ या दुसऱ्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाविषयीची त्यांची कल्पना सांगितली. या कार्यक्रमाअंतर्गत जे विद्यार्थी एकाग्र होऊन अभ्यास करू शकत नाहीत, त्यांना सरळवास्तुद्वारे अभ्यास आणि एकाग्रतेचे तंत्र शिकविण्यात येईल. सरळ वास्तु तज्ञ कर्नाटकातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देतील, ज्यामुळे ते दिशादर्शक यंत्राचा (कंपास) अभ्यास करणे शिकतील आणि मुलांना त्यांच्या कल्याणासाठी अनुकूल दिशा ला बसण्यास सांगतील.