मुख्यद्वाराच्या दिशा कशा तपासायच्या ?

प्रतिकूल किंवा अनुकूल दिशा व्यक्तिच्या जन्मतारखेवर आधारलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीची योग्य अशा चार शुभ आणि चार अशुभ दिशा असतात. दक्षिण अथवा पूर्व दिशा व्यक्तीला अनुकूल दिशा असेल तर या दिशांकडे तोंड करून घर किंवा प्रतिष्ठानची समृध्दी साध्य करणे शक्य आहे.

सरळ वास्तु तक्ता (चार्ट) तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला अनुकूल दिशा पुरवितो. जर तुमच्या कार्यस्थळ अथवा घराचे मुख्यद्वार अनुकूल दिशा ला नसेल तर तुम्ही सर्वकाही म्हणजेच स्वास्थ्य, संपत्ती, समृध्दी, नातेसंबंध आणि प्रसिध्दी गमवू शकता. जर मुख्य द्वार दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या प्रतिकूल दिशेत येत असेल तर असे वाईट परिणाम मिळतात. अशा प्रकारे व्यापारात नुकसान, कुटुंबात अशांती, न्यायालयाचे मामले, आरोग्याविषयी समस्या असे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

परंतु, चांगली बातमी अशी आहे की, सरळ वास्तुसारख्या लोकप्रिय शास्रामध्ये प्रत्येक समस्यांवर उपाय आहे. अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर व्यावहारीक आणि लागू पडणारे सार्वत्रिक उपाय आहेत. अशा प्रकारे तुमच्या घराच्या मुख्यद्वाराचे पुर्ननिर्माण करणे इत्यादी कोणत्याही प्रकारचा घरात संरचनात्मक बदल करण्याची गरज नाही. सरळ वास्तुच्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा दडपली जाते आणि घराच्या आसपास सकारात्मक ऊर्जा वाढविली जाते व सरळ वास्तुच्या योग्य अमंलबजावणीमुळे वास्तुमधील असलेल्या नकारात्मक प्रभावावर मात करता येते.