तुमच्या नातेसंबंधांवर वास्तुचा कसा परिणाम होईल ?

डॉ. श्री. चंद्रशेखर गुरूजींनी अनेक वर्षांच्या संशोधनातून शोधलेले सरळ वास्तुचे नातेसंबंधांसाठी वास्तु ही एक अद्वितीय आणि शास्त्रशुध्द उपाय आहे. कुटुंबियांमधील नातेसंबंध, कार्यालयातील सहकाऱ्यांमधील किंवा व्यवसायातील भागीदारांमधील नातेसबंधांचा त्यांच्या घराच्या, कार्यालयाच्या अथवा व्यवसायाच्या सभोवताली प्रवाहित होणाऱ्या ऊर्जेमुळे परिणाम होतो. विशेषतः त्या क्षेत्रावर आणि त्यांच्या कामावर व राहण्यावर त्याचा परिणाम होतो.

पारंपारिक कुटुंबरचनेमध्ये नातेसंबंध हा महत्त्वाचा भाग आहे पण पती-पत्नी, भावंडे, काका आणि काकू, जवळचे मित्र, शेजारी यांचा रोजच्या जीवनात महत्त्वाचा सहभाग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पती-पत्नीमधील नातेसंबंध पवित्र मानले जातात पण आजच्या जगात आपण नातेसंबंधात विभाजन आणि मुलांच्या समस्येमुळे घटस्फोट व वेगळे होणे अशी बरीच प्रकरणे पाहतो आहोत. यामुळे समाजात खूप मोठ्या प्रमाणात विसंघटन आणि अस्वस्थता निर्माण होण्यास कारणीभूत आहे.

नातेसंबंधामधील समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुचे महत्त्व –

प्रत्येक घरात किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी नातेसंबंधांचे स्थान असते. कधीकधी नातेसंबंधांचे स्थान घरात किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी नसते. जरी नातेसंबंधाचे स्थान घरामध्ये असले तरी ते स्नानगृह किंवा शौचालय आणि उपयुक्तता खोली यांच्यामुळे अडथळा येतो त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो.

प्रत्येक घरात आणि कामाच्या जागेच्या ठिकाणी नातेसंबंधांचे स्थान असते. जर नातेसंबंधाचे स्थानात स्नानगृह किंवा शौचालय आणि उपयुक्तता खोली यांच्यामुळे अडथळा येत असेल तर स्पष्ट केल्याप्रमाणे नातेसंबंधात आपोआपच समस्या निर्माण होतात.
जर स्वयंपाकघराची दिशा अनुकूल नसेल तरी सुध्दा कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधात समस्या येतात.तापट देवी किंवा देवाचा फोटो बसण्याच्या खोलीत किंवा झोपण्याच्या खोलीत टांगलेत तर कुटुंबातील सदस्यांची अकारण भांडणे आणि आक्रमक वर्तवणूक अभिव्यक्त होते.

सरळ वास्तुमुळे ताणलेल्या किंवा तुटलेल्या नातेसंबंधांमध्ये होणारी मदत

कोणत्याही प्रकारची रचनात्मक तोडफोड किंवा बदल न करता  सरळ वास्तुमुळे घरातील किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी परिणाम झालेल्या नातेसंबंधावर उपाय सापडतो.

सरळ वास्तु उपायांमध्ये नातेसंबंधांसाठी सर्वोत्तम दिशा आणि सर्वोत्तम झोपण्याच्या दिशा सुचवितात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा भावनिक गुणांक वाढतो.  चक्रांना संचलित करण्यामुळे नातेसंबंधातील गुणांकही सुधारतो.
भिंतीवर सकारात्मक चित्र लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या संबंधात नक्कीच सकारात्मक वाढ होते.

तुमचा वैयक्तिक वास्तु नकाशा घ्या आणि तो वास्तु चार्ट तुमच्या कामाच्या जागेशी अथवा घराशी किती सुसंगत आहे याचे विश्लेषण करा.