कायदेशीर समस्यांवर वास्तुचा कसा प्रभाव पडू शकेल ?

आजकालच्या जगात कटुता, वितुष्ट, मतभेद, दुसऱ्यांविषयी द्वेष या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही पण त्या रोजच आपल्या समोर येतात आणि रोजच आपल्याला त्याला तोंड द्यावे लागते. याचा व्यक्तीच्या मानसिक शांतता आणि सुसंवादावर परिणाम होतो असे नाही तर अनवधनाने संपूर्ण कुटुंब आणि त्याच्याशी संबधित व्यक्तींनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. यामुळे समाजाच्या नजरेत कुप्रसिध्दी मिळते आणि कुटुंबाची अप्रतिष्ठा होते तसेच कुटुंबातील सदस्यांना तुच्छ लेखले जाते.

खेळीमेळीने जर याचे निराकरण केले नाही तर व्यक्तींमधील ह्या समस्या उत्तरोत्तर वाढत जाऊन अवघड होतात आणि वर्षानुवर्षे निवारण होण्याची चिन्हे न दिसणाऱ्या कायदेशीर खटल्यापर्यंत पोहचू शकतात.

न्यायालयीन खटले अविरतपणे चालू असणे

प्रत्येक घरात किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी विवेकाचे स्थान असते. जेव्हा विवेकाच्या स्थानाला धक्का पोहोचतो तेव्हा साहजिकच न्याय मिळण्याकरिता न्यायालयीन खटले चालू होतात. जर घराचे किंवा कामाच्या जागेचे मुख्यद्वार अथवा प्रवेशद्वाराची दिशा अनुकूल नसेल तर त्यामुळेही विवेक स्थान बाधित होते. कुटुंबातील मालमत्तेवरून होणारे वाद, वारसा हक्क, वारसांसाठी बनविलेल्या मृत्युपत्राचा चुकीचा अर्थ लावणे इत्यादी, मालमत्ता वाद व दुसऱ्या किंवा तृतीय पक्षाद्वारे मृत्युपत्रातील मालमत्तेविषयी आव्हान केलेले न्यायालयीन दावे, मालमत्तेविषयीचे न्यायालयीन खटले, कुटुंबांशी संबंधित दिवाणी आणि फौजदारी खटले होतात. कोणतीही समस्या एकदाशीच निकालात काढण्यासाठी कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. सुनावणीच्या तारखा सतत स्थगित झाल्यामुळे न्यायनिवाडा होण्यास विलंब होतो.

सरळ वास्तुमुळे गुंतागुंतीच्या न्यायालयीन दावे आणि न्यायालयीन खटल्यांना कशी मदत होते ?

 

कोणत्याही प्रकारची रचनात्मक तोडफोड किंवा बदल न करता सरळ वास्तुचे सोपे आणि शास्त्रशुध्द उपाय करून सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित करून नकारात्मक ऊर्जा कमी केली जाते. अशा प्रकारे घरामध्ये सकारात्मक वलय तयार झाल्याने अंतिम न्याय हा निश्चितपणे संबंधित कुटुंबाच्या मर्जीप्रमाणे असेल.

सरळ वास्तु सूचित `सर्वोत्तम विवेक दिशा’ दाखवितो ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतात व प्रलंबित खटले किंवा न्यायालयीन प्रक्रिया जिंकण्याच्या संधी वाढतात. यामुळे न्यायालयीन खटले एकदाचेच संपण्याच्या शक्यता सुधारतात.

तुमचा वैयक्तिक वास्तु नकाशा घ्या आणि तो वास्तु चार्ट तुमच्या कामाच्या जागेशी अथवा घराशी किती सुसंगत आहे याचे विश्लेषण करा.