शैक्षणिक संस्थांसाठी वास्तुचे महत्त्व

शैक्षणिक संस्थांचे स्थापत्य (वास्तु) शिक्षण संस्था, विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक यांच्या सफलतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. बऱ्याच यशस्वी शैक्षणिक संस्था ह्या वास्तुशी योग्य प्रकारे अनुरूप असे वास्तुकलेचे अप्रतिम नमूने आहेत.

सरळ वास्तु अनुसार, शैक्षणिक संस्थांची वास्तु ही शैक्षणिक संस्थां प्रमुखाच्या वास्तु दिशांशी संरेखित असाव्यात. संस्थेची वास्तु जर संस्थाप्रमुखाशी अनुरूप नसेल तर वास्तुला अनुरूप मुद्दे हाताळण्यासाठी काही उपाय दिले जातात.

विद्यार्थ्यांसाठी
for-students

शाळा, महाविद्यालय किंवा कोचिंग संस्थांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आपला बराच वेळ आपल्या शिक्षकांना ऐकण्यात, अभ्यासक्रमाचा सराव करण्यात घालवतात. विद्यार्थ्यांसाठी योग्य दिशेत बसणे हे महत्त्वपूर्ण आहे ज्यामुळे त्यांचे अजना चक्र योग्य रितीने सक्रिय राहते आणि विद्यार्थी एकाग्रतेने संकल्पना ऐकून व समजून घेण्यात सक्षम होतात. अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आणि नीटनिटके असावे. त्यावर खूप पुस्तकांचा पसारा नसावा किंवा त्यावर इतर वस्तूंचा खूप भार असू नये.

वर्गासाठी
vastu-for-educational-institutes-for-students-class-room

एक यशस्वी शिक्षण संस्था चालविण्यासाठी वर्गाचे अत्यंत महत्त्व असते जिथे विद्यार्थी आपला जास्तीतजास्त वेळ व्यतित करतात. वर्ग खोली स्वच्छ, सतेज, कोणत्याही वाईट वासापासून मुक्त, योग्य प्रकाश आणि हवेशीर असावा. वर्गखोलीच्या स्थानाची काळजी घेणे आवश्यक आहे ज्यामुळे विद्यार्थी वर्गखोलीच्या आसपास गोंगाट आणि गर्दीला टाळू शकतील. वर्ग खोलीचे स्थान बीम किंवा स्नानगृहाच्या खाली नसावे. वर्गात विद्यार्थ्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करण्यासाठी प्रेरणाचित्रे किंवा प्रतीके योग्य स्थानांवर ठेवावी. चालणारे घोडे, उगवता सूर्य, देवी सरस्वतीचे चित्र, विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश दाखविणारे फोटो व विजयचिन्हे यांचा प्रतीकांमध्ये समावेश होतो.

वर्ग खोलीचा रंग गडद असावा. एकाग्रतेत अडथळे आणणारे खांब, फर्निचरचे कोपरे, उघडी कपाटे यांना टाळावे. अभ्यासाचे टेबल भिंतीच्या समोर ठेवू नये.

आपला व्यक्तिगत वास्तु नकाशा प्राप्त करा आणि हा वास्तु नकाशा तुमच्या कामाच्या जागेच्या ठिकाणी किंवा घराशी अनुरूप आहे किंवा नाही याची बारकाईने तपासणी करा.