वास्तुचा तुमच्या कार्यालयांवर कसा परिणाम होईल ?

saral-vastu-corporates

व्यापार आणि वाणिज्याचे व्यावसायिक जग हे पूर्णपणे नफ्यावर अवलंबून असते ज्यामुळे अतिशय कठीण परिस्थितीत तरून जाण्याचे हे प्रमुख कारण आहे. उद्योजक, विशेषतः जे पहिल्यांदाच उद्योजक आहेत त्यांना त्यांच्या कल्पनांसाठी पुरेशी संसाधने मिळणे अवघड जाते आणि जरी त्यातूनही ते यशस्वी झाले तरी त्यांच्या सुरूवातीच्या छोटय़ा व्यवसायात लाभार्जनाच्या स्थितीशिवाय व्याजाचे उच्च दर आणि व्यावसायिक सेवा ह्या मोठ्या मुश्कीलीने सुटणारी समस्या बनते. काळजी, विफलता आणि स्वतःमधील आत्मविश्वासाचा अभाव हे काही गुणधर्म आहेत ज्याच्याशी रोजच्या रोज त्यांचा परिचय होत आहे. सरळ वास्तुच्या सिध्दांताचे अनुसरण केल्याने त्यांचे सौभाग्य किंवा सोनेरी क्षण त्यांची वाट पाहात असते. त्यांच्या कार्यस्थळाचा किंवा कारखाना इत्यादीचे उचित सर्वेक्षण केल्यावर सरळ वास्तुच्या सिध्दांतांच्या प्रयोगामुळे निःसंशयपणे आणि खात्रीने यशाचे आश्वासन खात्रीने देता येते.

कार्यालयांमध्ये चैतन्यपूर्ण कार्य परिसरासाठी वास्तु

विभाग, संचालक, बसायच्या जागा आणि महत्त्वाच्या सदस्यांच्या योग्य दिशा ह्या निर्णायक घटकांवर ध्यान दिल्यास कार्यालयांमध्ये उल्लेखनीय सकारात्मक बदल सरळ वास्तुद्वारा उपलब्ध केले जातात.

कोणत्याही प्रकारचा संरचनात्मक बदल न करता किंवा पुर्नविकास न करता उभारणीच्या वर्तमान योजनेचा प्रयोग करून व्यवसायी त्यांच्या कामाची जागा अथवा युनिटच्या कार्यपरिसरराच्या वातावरणामध्ये उल्लेखनीय प्राप्त करून शकतो. फक्त त्यांना परिसरात महत्त्वपूर्ण स्थानांच्या अनुकूल दिशांचे पालन करणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या सिध्दांतानुसार प्रमुख कर्मचाऱ्यांच्या बसणाच्या जागा, वित्त, मनुष्यबळ विकास, ग्राहक सेवा सारख्या महत्त्वपूर्ण विभागांच्या जागेची योजना बनविणे आवश्यक असते. लक्षणीय परिवर्तन प्राप्त करण्यासाठी कार्यालयाच्या प्रमुख ऊर्जास्थानांची काळजी घेतल्याने सकारात्मक ऊर्जेमुळे येणाऱ्या लाटांच्या उच्चबिंदूमुळे चैतन्यपूर्ण, स्फूर्तीप्रधान, आनंदी आणि उत्साहाने काम करण्यासाठी वातावरण प्राप्त होऊ शकते. चैतन्यपूर्ण वातावरणामुळे ग्राहक सेवेच्या उत्पादनक्षमतेमध्ये वाढ होते आणि त्यामुळे कार्यालय त्यांच्या ग्राहक व पक्षकारांना अधिक प्रभाव कार्यपध्दती आणि सेवा देऊ शकते.