मुलाधार चक्र अथवा मूळ चक्र ( रूट चक्र ) हे मानवी शरीरातील प्राथमिक चक्रामधील सर्वप्रथम चक्र आहे. जरी सगळ्या चक्रांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे तरी सुध्दा काही जणांचा विश्वास आहे की, मुलाधार चक्र आरोग्य व सर्व कल्याणासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. असे मानले जाते की, मागच्या जन्मातील आठवणी तसेच केलेल्या कार्याला या क्षेत्रात संग्रहित केले जाते. हे चक्र मानव आणि प्राण्यांच्या जाणीवांदरम्यान सीमा रेषेचे काम करते. येथे प्रत्येक व्यक्तीच्या भविष्याबदद्ल आणि व्यक्तित्व विकासाचा पाया बनण्यास सुरूवात होते. या चक्रामुळे मानवाला चेतनाशक्ती, जोम आणि संवर्धन ही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. मात्र हे चक्र जर अयोग्यपणे कार्यरत झाले तर परिणामस्वरूप आळस व स्वकेंद्रित वृत्ती निर्माण होऊ शकते.

प्रतिकात्मक रित्या हे चक्र कमळ व चार पाकळ्या या रूपात दर्शविले जाते ज्यामध्ये चार पाकळ्या या सुप्त मनाच्या चार भावनांना सूचित करतात. या चक्राचा मंत्र आहे ` लाम ‘. मुलाधार चक्र किंवा आपले मूळ हे ` धरा ‘ आहे आणि त्याचा रंग लाल आहे.

मुलाधार चक्राचे स्थान -

मुलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या मूळ सुरूवातीला स्थित असते.

मुलाधार चक्राशी संबंधित अवयव आणि आजार -

या चक्राद्वारे पुनरूत्पादक अवयव, रोगप्रतिकारक प्रणाली आणि मोठे आतडे या अवयवांना नियंत्रित केले जाते.
अनुचित प्रकारे कार्य करणाऱ्या मुलाधार चक्रामुळे पुःरस्थ ( प्रोस्टेट ) ग्रंथीच्या समस्या, लठ्ठपणा, संधिवात, अशुध्द रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गांठींच्या नसांच्या समस्या, माकड

हाडाच्या समस्या, कटिप्रदेशाचे ( नितंब ) आजार, गुडघेदुखी आणि भूक मंदावणे यासारख्या समस्या निर्माण होतात. व्यक्तीच्या हांडांची रचना दुर्बळ असते आणि शारिरीक रचना अशक्त असते.

अवरूध्द आणि असंतुलित मुलाधार चक्रामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या -
 • अति सक्रिय मुलाधार चक्र –
  ज्यांचे मूळ चक्र अति सक्रिय असते ते छोट्याशा कारणावरून राग येऊन आक्रमक व त्रस्त होतात. व्यक्ती लोकांना धमकाविण्यास सुरूवात करतो आणि अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळणे कठीण होते. जे लोक लोभी असतात आणि भौतिक सांसारिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात त्यांचे मुलाधार चक्र अति सक्रिय असते.
 • निम्न सक्रिय मुलाधार चक्र
  ज्यांचे मूळ चक्र कमी सक्रिय असते त्या लोकांना स्वतःला असुरक्षित वाटते. व्यक्ती स्वतःला मातीशी एकनिष्ठ ठेवण्यास असमर्थ असतात तसेच बाहेरच्या जगापासून स्वतःला वेगळे करतात. दैनिक कार्ये पूर्ण करण्यास आणि शिस्तबध्द व संघटित राहण्यास त्यांना अवघड जाते. जे लोक चिंताग्रस्त, लाजाळू तसेच अति बेचैन असतात त्यांचे मूळ चक्र कमी सक्रिय असते.
संतुलित मुलाधार चक्राचे फायदे -

मूळ चक्र इतर सर्व प्रमुख तसेच लहान चक्रांना जीवन ऊर्जा वितरित करतो. जेव्हा मूळ चक्र संतुलित असते तेव्हा व्यक्ती निरोगी असतो तसेच त्याचे एकूणच हितस्वास्थ्य उत्तम असते. तो किंवा ती शारिरीक रित्या सक्रिय तसेच निश्चयी होतात.

मुलाधार चक्राला उघडणे -
 • प्रथम चक्राला उघडण्यासाठी व्यक्तीला पाठीच्या कण्याच्या मूळ स्थानावर जिथे हे चक्र स्थित आहे तेथे ध्यान केंद्रित केले पाहिजे. या केंद्रबिंदूवर ध्यान करताना कमळाच्या फुलाची कल्पना करा.
 • मुलाधार चक्राचे तत्त्व ` पृथ्वी ‘ आहे. पायामध्ये काहीही न घालता गवतावर आणि वाळूवर चालणे हे चक्र उघडण्याचा एक मार्ग आहे. असे मानले जाते की, पायाची सफाई करणे ( पेडिक्योर ) किंवा नृत्य करण्याने या चक्राला प्रभावित केले जाऊ शकते.
 • कोणत्याही निवासासाठी ( घर, दुकान, कार्यालय इत्यादी ) सरळ वास्तुच्या सिध्दांतांना लक्षात ठेवण्याने आणि अनुकूल दिशांचा सामना करणे हा मुलाधार चक्र उघडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
 • यलांग यलांग ( एक पिवळ्या रंगाचा सुगंधित वृक्ष ), जेरेनियम गुलाब ( तांबडी किंवा पांढरी फुले येणारे एक फुलझाड ), एंजेलिका इत्यादी आवश्यक तेलांना ध्यानधारणा करताना नाडी बिंदूवर लावल्याने चक्र उघडण्यास मदत होते. आळीपाळीने या तेलांने पायाला मालिश करू शकतो.
 • लाल सफरचंद, डाळींब, स्ट्रॉबेरीज्, बीट, लाल मूळा इत्यादी खाण्याचे पदार्थ प्रथम चक्राला पोषण देतात.