या बद्दलही बर्याच वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वास्तुशास्त्रातील पंडितांनी लिहिले आहे. परंतु तुम्ही तीन दरवाजे का असू नयेत असे विचारले तर त्यांचाजवळ उत्तर नसते. ते जाऊ दे … एखादवेळी चार किंवा पाच दरवाजे एकाच सरळ रेषेत असतील तर काय होईल असे विचारले तरी तुम्हाला उत्तर मिळणार नाही.

घराच्या मध्ये सरळरेषेत दरवाजे दिसतात

घराच्या मध्ये असलेला दरवाजा तोडून बाजूला ठेवलेला दिसतो.

एकदा गोकाकमध्ये व्याख्यानाला गेलो असता मी सभेला उद्देशून तीन दरवाजे एका रेषेत का असू नये हा प्रश्न विचारला. तेव्हा एका गृहस्थ तीन दरवाजे एका सरळ रेषेत असले तर आयुष्याचे तीन तेरा होतात, म्हणजेच वाटोळा होते म्हणाले. मी यांना मग चार दरवाजे असतील तर चार तेरा होतात का असा उलट प्रश्न विचारला. या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी दरवाजा, भिंत तोडून टाकण्यात बर्याच जणांनी पैसा वाया घालवला आहे. असे केल्याचे आम्ही अनेक घरांमध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे.

घराच्यामध्ये असलेल्या सरळ रेषेतील दरवाज्याला सरळवास्तुच्या सल्ल्याने पडदा टाकलेला दिसतो. वरचे चित्र पाहिलेत तर केलेला बदल तुमच्या लक्षात येईल. या प्रकारे तीन दरवाजे असल्यास सरळवास्तुमध्ये कोणता उपाय सुचविला जातो असे तुम्ही विचाराल. तो कसा आहे कळल्यावर तुम्ही पण उपाय इतका सोपा असे आश्चर्यचकित व्हाल. मधल्या दरवाज्याला एक पडदा लावणे हा तो उपाय आहे. कोणताही एक दरवाजा बंद करुन दुसरीकडे दार लावण्याची गरज नाही. हा उपाय वापरायला सोपा व कमी खर्चाचा आहे आणि याचे परिणामही लगेच काही तासांमध्ये जाणवतील.

सरळ रेषेत तीन दरवाजे का नसावे हा आपला पहिला प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्याचे वैज्ञानिक विµलेषण मी आपल्याला सांगतो. एका दाराने प्रवेश करणारी शक्ति (एनर्जी) तशीच सरळ दुसर्या दरवाज्याने बाहेर पडते. त्या बाहेर पडणार्या शक्तिमुळे त्या जागेतील शक्ति (एनर्जी) नाहीशी होऊन त्या घरात आरोग्याचा त्रास व मानसिक ताण उद्भवतात. पडदा टाकल्यामुळे या सर्व त्रासांपासून सुलभपणे सुटका होते. सरळ रेषेत तीन किंवा पाच दरवाजे असतील तरी अशा सुलभ उपाययोजनेने समस्या सोडवता येईल.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

clear formSubmit