डॉ. चंद्रशेखर गुरूजी

लाखों लोकांसाठी संस्थापक, सल्लागार, मार्गदर्शक

`रात्री झोपेत पाहतो ती स्वप्न नव्हेत तर जी गोष्ट आपल्याला झोपू देत नाही ते म्हणजे स्वप्न” – एपीजे अब्दुल कलाम

सरळ वास्तु चे प्रणेते आणि स्फूर्तीस्थान अशा आमच्या सन्माननीय डॉ. चंद्रशेखर अंगडी (गुरूजी) बद्दल हा उल्लेख खरोखर योग्य आहे.

लहानपणापासूनच गुरूजींना लोकांना भेडसावणार्‍ऱ्या समस्यांविषयी जिज्ञासा होती आणि क्लेशही होत असे. अगदी ८ वर्षांचे असताना निःस्वार्थपणे भारतातील जुन्या देवळांचे पुनरूत्थापन करण्यासाठी लोकांकडून देणगी गोळा करण्याचे काम हाती घेतले, जे देऊळ त्यांच्या पणजोबांनी बांधले होते. आपल्या गावातील लोकांच्या जीवनात सुखसमाधान मिळवून देणे हा पुनरूत्थापन करण्यामागचा उद्देश होता जी जागा एके काळी सकारात्मक ऊर्जेने भरलेली अशी गजबजलेली जागा होती.

वयाच्या १४व्या वर्षी,अल्पवयातच गुरूजींच्या मनात विचार सुरू झाले की त्यांचे जीवन सत्कारणी कसे लावता येईल आणि त्याचवेळी त्यांनी सैन्यात भरती व्हायचे पक्के केले. दोन-तीन वेळा त्यांनी प्रयत्न करूनही वैद्यकीय कारणांमुळे त्यांची निवड झाली नाही.

परंतु ते त्यांच्या विचारांवर अटळ होते आणि जेव्हा त्यांनी व्यावसायिक स्थापत्य कंत्राटदार म्हणून मुंबईमध्ये करियरला सुरूवात केली, तेव्हा त्यांनी ९५ मध्ये गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने `शरण संकुल ट्रस्ट’ची स्थापना केली. ते त्या ट्रस्टचे संस्थापक आणि विश्वस्त आहेत.

त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अतिशय साधी होती आणि स्थापत्य अभियंता झाल्यावर त्यांनी स्थापत्य कंत्राटदार म्हणून मुंबईमध्ये व्यावसायिक कारकीर्द सुरू केली आणि त्यात यशही मिळविले. व्यवसायात त्यांना थोडे नुकसान झाले, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी कामासाठी दिलेले पैसे अडकले होते आणि अशा प्रकारे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केली.

या परिस्थितीला  दुसऱ्यांना दोष न देता अंतर्मुख होऊन व्यवसायात येणाऱ्या अडचणींची कारणे शोधली जी मानसिक दबावाला कारणीभूत होती.

१९९८ सालच्या मध्यात त्यांच्या स्वप्नातील घराच्या आराखड्याचे कल्पनाचित्र रंगविले. त्यांना ते स्वप्न सतत काही काळ पडत होते आणि तेव्हा ते स्वप्नात येणाऱ्या गोष्टींचा एकेक संदर्भ जोडू लागले ज्या गोष्टी त्यांच्या रोजच्या जीवनात घडत होत्या.

यामुळेच त्यांची एका वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू झाली ज्यामुळे त्यांना समजले की त्यांच्या अडचणींचे कारण हे त्यांच्या घरात आणि कामाच्या जागेशी निगडीत आहे. या गोष्टींच्या मुळाशी जाण्याचे त्यांनी ठरविले आणि आपल्या प्राचीन पूर्वजांनी चिरकाल टिकणाऱ्या सुंदर स्मारकांना बांधण्यासाठी एकत्रित केलेल्या ज्ञानाच्या आणि संसाधनांच्या संकल्पना समजून घ्यायला सुरूवात केली जी स्मारके उध्वस्त होऊनही आजही खंबीरपणे भक्कम उभी आहेत.

हाच तो सहजगत्या मिळालेला `युरेका’ क्षण होता, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या शास्त्रशुध्द संकल्पना काही काळाच्या संशोधनाने विकसित आणि परिपूर्ण केल्या. `सरळ वास्तु’ ही एकमेव शास्त्रशुध्द उत्तर आहे जे प्राचीन भारतीय संस्कृती आणि स्थापत्यशास्रावर आधारित आहे. याचा अवलंब केल्यावर व्यक्तीच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात सर्वच क्षेत्रात आनंद आणि यश प्राप्त होऊ शकते.

गुरूजींची ५ मूलभूत तत्त्वे

तरूण आणि तडफदार चंद्रशेखरांचे समाजसेवक, मार्गदर्शक, सल्लागार आणि मानवजातीचे गुरूजी यामध्ये परिवर्तन होईपर्यंत ते अथक आपल्या स्वप्नास सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नशील होते. आजचे चंद्रशेखर गुरूजी बनण्यासाठी गुरूजींनी आपल्या जीवनात पुढील ५ तत्त्वांना अंगीकृत केले

आपल्या जीवनात कोणाचीही फसवणूक करू नका

प्रामाणिकपणे जीवन जगणे हे आपल्या आत्म्याचे निर्विषीकरण करणे आहे. आणि ज्या व्यक्ती याचे नित्यनेमाने पालन करतात त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात प्राप्त होतात.

उच्चपदावर पोहोचलात तरी नेहमी नम्र रहा

तुम्ही यशाचा कळस गाठला तरी हे महत्त्वाचे आहे की पाय नेहमी जमिनीवरच असावेत आणि आपण आपल्या स्वतःचे असावे. यामुळे यश मिळण्याची खात्री देता येते आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे समर्थनही मिळते.

तुमच्या आईवडिलांना नेहमी आनंदी ठेवा आणि त्यांचे आशिर्वाद घ्या

टिया वॉकर यांनी अगदी बरोबर म्हटले आहे की “ज्यांनी आपली काळजी घेतली त्यांची काळजी घेणे हा सर्वोच्च सन्मान आहे”.
आपल्या निर्मात्यांची (जन्मदाते) काळजी घेतल्याने व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला सुख, समृध्दी आणि सफलतेचा आशिर्वाद कायम मिळतो.

गरजू  व्यक्तींना नेहमी मदत करा

निःस्वार्थपणे प्रेम आणि मदत दिल्याने विपुलता आकर्षित होते आणि विशेषतः गरजू व्यक्तींना निःस्वार्थपणे प्रेम आणि मदत दिल्याने विपुलता अजून वाढते.

इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतः खुश रहा

आपण जेथे राहतो आणि काम करतो तेथूनच सुखाची सुरूवात होते आणि म्हणून अंर्तमन आनंदी आहे हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे की ज्यामुळे इतरांना आनंदी ठेवण्यास आपण समर्थ होऊ.