are-you-financially-prepared-for-retirement

सेवा निवृत्ती म्हणजे काय ? तुम्ही सरकारी नोकरीत किंवा खाजगी कंपनीत अथवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात कार्यरत असले तरी सेवानिवृत्ती हे एक वास्तव आहे. हे एक सत्य आहे. लोक यास कशा प्रकारे हाताळतात यात विभिन्नता आहे.

नियोजन न केलेल्या सेवानिवृत्तीमध्ये लोकांना तणाव असतो. उलटपक्षी जे लोक आधीच सेवानिवृत्तीचे नियोजन करतात व त्याची ते खूप आतुरतेने वाट पाहात असतात. ज्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या योजना आधीच अनेक वर्षांपूर्वी आखलेल्या असतात त्यात खर्चिक यात्रा, क्लबमध्ये दाखल होणे, आपल्याला आवडेल त्या गोष्टींकडे आस्थापूर्वक लक्ष देणे (passion) ज्या गोष्टी त्यांनी नोकरी करणे किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुर्लक्ष केले होते यासारख्या गोष्टी भविष्यात करण्याची वाट पाहात असतात.

तथापि सगळ्यात मोठा प्रश्न सेवानिवृत्तीच्या आधी प्रत्येक जण विचारतो की निवृत्त होणारी व्यक्ती आर्थिक व भावनिक रित्या जीवनात नव्याने येणार्‍्या पुढील सेवानिवृत्तीच्या टप्प्यासाठी तयार आहे का ?

तुम्ही आर्थिकदृष्ट्या या सेवानिवृत्तीसाठी तयार आहात का ?

 • जेव्हा कोणतीही व्यक्ती सेवानिवृत्त होते तेव्हा त्यांचे उदरनिर्वाहाचे मापदंड बदलतात. लहान वयातच पैसे वाचविण्यास सुरूवात करणे आणि विशेषतः सेवानिवृत्तीसाठी निश्चित निधीची गुंतवणूक करणे एक चांगला उपाय आहे. बचतीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा किंफा प्रत्येक महिन्यात किंवा वर्षातून दोनदा पैशाची गुंतवणूक करा. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सेवानिवृत्तीसाठी असलेल्या लक्ष्यापासून ढळू नका.
 • सेवानिवृत्ती खर्चिक आहे. तुमचे खर्च जरी कमी झाले तरी तुम्ही कमवित नसल्यामुळे उणीव भरून काढण्यासाठी तुमच्याकडे धनराशी असणार नाही. संशोधनावरून असे लक्षात आले आहे की, व्यक्तीला खर्चासाठी सेवानिवृत्तीच्या पूर्वी खर्च होणा र्‍्या रकमेच्या 70 ते 90 टक्के रकमेची निश्चितपणे आवश्यकता असते.
 • पैसे वाचविण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहारातील आणि पर्यायी अशा दोन्ही पध्दतींचा वापर करा. प्रत्यक्ष व्यवहारातील पध्दतीमध्ये पेन्शन योजना आणि आरोग्य विमा योजनेमध्ये गुंतवणूकीचा समावेश असतो. पर्यायी पध्दतीमध्ये वास्तुशास्राचा समावेश होतो ज्यामध्ये तुमची वित्तहानी टाळण्यास मदत होते. उदाहरणार्थ, तुमच्या घरातील पाईप्स अथवा नळांमधून पाणी टपकत असेल तर ते तुमच्या पैशाची गळती होत आहे असे सुचविते. अशी गळती लगेचच नियंत्रणात येईल याची खात्री करावी.
 • तुम्ही जिथे काम करता त्या कंपनीच्या मालकाला (employer) सेवानिवृत्ती योजना चालू करण्याविषयी विनंती करावी. असे बरेच सेवानिवृत्ती योजनांचे पर्याय नोकरीस ठेवणारा मालक (employer) त्याच्या कर्मचार्‍्यांसाठी सुरू करू शकतो.
 • तुमच्या करांचे नियोजन हुशारीने करा. सेवानिवृत्तीनंतर लोकांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि इतर म्युच्युअल फंड मोडल्यावर एकरकमी धनराशी मिळते. त्यावरही कर लागू शकतो. या सर्व बाबींवर व्यावसायिकाचा सल्ला घेण्यासाठी संपर्क करा.

तुम्ही भावनिकदृष्ट्या सेवानिवृत्तीसाठी तयार आहात का ?

 • तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेचा उपयोग कसा करणार आहात ? जर तुम्ही विविध ठिकाणांची यात्रा करणार असाल अथवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी योजना बनविणार असाल तरीही तुमच्याकडे एवढे सगळे करून मोकळा वेळ शिल्लक राहील. त्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन करा. भविष्याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी तसेच चिंता टाळण्यासाठी ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला जातो.
 • व्यक्तीचे जसे वय वाढत जाते तसे त्याच्या आरोग्याच्या समस्या हा एक चिंतेचा विषय आहे. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेने व्यापले जाईल याचा प्रयत्न करा. आरोग्यासाठी वास्तूचे योग्य प्रकारे पालन केल्यास ते प्रभावी ठरते. उदाहरणार्थ, सैंधव मीठ घरात ठेवल्याने परिवारातील सदस्यांच्या मनःस्थितीमध्ये वाढ होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वार कचरा व अडगळीपासून मुक्त ठेवल्यामुळे सकारात्मकतेमध्ये वाढ होते जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 • चांगल्या ऊर्जेच्या प्रवाहासाठी घर स्वच्छ व टापटीप ठेवा, जुने फर्निचर, तुटलेले आरसे आणि न वापरलेली विद्युत उपकरणे काढून टाका.
 • नेहमी सकारात्मक रहा. बाहेर जा आणि कार्यरत रहा. जास्त वेळ घरात बसल्याने जास्त सुस्ती येते.
 • ज्या गोष्टींना तुम्ही करण्यासाठी टाळत होता किंवा ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी कराव्याशा वाटत होत्या अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

तुमचे सेवानिवृत्त जीवन चांगले जावो.

2 Comments
 1. Sandip

  Thanks

  • saral vaastu

   Dear Sandip,You are Welcome

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

clear formSubmit