अजना चक्राला तृतीय नेत्र चक्र अथवा भृकुटी चक्र किंवा भुवई चक्र म्हणतात जे मानवी शरीराचे सहावे प्राथमिक चक्र आहे. याला अंर्तदृष्टी चक्र किंवा सहावे चक्र म्हणूनही ओळखले जाते. याला तृतीय नेत्र चक्र म्हणून संबोधले जाते कारण हे चक्र स्वतःची वास्तविकता ओळखून ज्ञानाचे दरवाजे उघडण्यास मदत करते.

प्रतिकात्मक दृष्ट्या हे चक्र कमळाच्या फुला बरोबर दोन पाकळ्यांच्या रूपात दर्शविले जाते आणि हे मानवी चेतना ( समज, स्पष्टता आणि ज्ञान ) व परमात्मा यांच्या मधील विभाजन रेषा आहे. या चक्रामुळे मिळणारी ऊर्जा स्पष्ट विचार, आत्म चिंतन तसेच आध्यात्मिक जागरूकता प्राप्त होण्याची परवानगी देते. अजना चक्र नीळ रंगाने दर्शविला जातो व याचा मंत्र ` ओम ‘ आहे.

अजना चक्राचे स्थानं

अजना चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये तसेच नाकाच्या पुलाच्या थोडेसे वर आहे. हे डोळ्यांच्या मागे तसेच डोक्याचा मध्यभागात स्थित असल्याचे म्हटले जाते. परंपरागत पध्दतीने स्रिया कुंकू लावतात आणि पुरूष कपाळावर तिलक लावतात तिथे अजना चक्र सक्रिय होते किंवा चक्राचे प्रतिक असते.

अजना चक्राशी संबंधित अवयव आणि आजार -

अजना चक्र द्वारा मुख्यतः डोळे, कान, नाक, डोके आणि मज्जासंस्था हे अवयव नियंत्रित केले जातात. पीयुषिका ग्रंथी ( पिट्युटरी ग्रंथी ) व शीर्ष ग्रंथी ( पीनियल ग्रंथी ) सुध्दा या चक्राद्वारे नियंत्रित केल्या जातात.

असंतुलित अजना चक्राशी संबंधित शारिरीक समस्यांमध्ये वारंवार डोकेदुखी, सायनसची समस्या व दृष्टिदोष या आजारांचा समावेश असतो तसेच इतर समस्यांमध्ये हटवादीपणा, खूप राग येणे आणि भयावह स्वप्न पडणे यांचा समावेश होतो.

अवरूध्द तसेच असंतुलित अजना चक्रामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या -
 • अति सक्रिय अजना चक्र –
  अति सक्रिय अजना चक्रामुळे अति क्रियाशील कल्पना शक्ती असणे, वास्तवापासून दूर जाणे असे परिणाम होऊ शकतात. ज्या व्यक्तीचे अजना चक्र अति सक्रिय असते ते काल्पनिक जगात राहतात आणि वारंवार भयावह स्वप्नांमुळे त्रस्त असतात. व्यक्तीला घटना लक्षात ठेवून आठवणे कठीण जाते आणि त्यांची मानसिकता न बदलणारी व पूर्वग्रहदूषित असते. अशा लोकांचे लक्ष सहज विचलित होते, चिंतेमुळे ते प्रभावित होतात तसेच त्यांची वृत्ती आलोचनात्मक व सहानुभूतीहीन असते.
 • निम्न सक्रिय अजना चक्र –
  साधारणपणे निम्न सक्रिय किंवा असक्रिय अजना चक्र असलेल्या व्यक्तींची स्मृती कमकुवत असते, त्यांना शिकण्यात अडचणी येतात आणि गोष्टींची कल्पना करणे तसेच काल्पनिक चित्र डोळ्यांसमोर आणणे कठीण जाते. त्यांच्या / तिच्यामध्ये अंतर्ज्ञानाचा ( इन्ट्युशन ) अभाव असतो तसेच दुसऱ्यांसाठी ते भावनाशून्य असतात व व्यवहारात नेहमी नकारात्मक भूमिका असते. काही प्रकरणांमध्ये कटू आठवणींपासून सावरण्यासाठी लोक या चक्राला बंद ठेवतात.
संतुलित अजना चक्राचे लाभ -

ज्यांचे अजना चक्र संतुलित असते ते आकर्षक व्यक्तिमत्वाचे तसेच अंतर्ज्ञानी असतात. त्यांच्या प्रसन्न स्वभावामुळे त्यांना गोष्टी स्पष्ट दिसतात आणि इतरांबद्दल कोणतेही पूर्वग्रह न ठेवता ते त्यांना स्विकारतात. ते प्रतिकात्मक रित्या विचार करून जीवनाचा अर्थ लक्षात घेतात. जेव्हा तृतीय नेत्र चक्र संतुलित असते तेव्हा लोकांना आपल्या स्वप्नांना लक्षात ठेवण्यास व त्याचा अर्थ लावणे सोपे जाते तसेच त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते.

अजना चक्राला उघडणे -
 • डोळे बंद करून व्यवसाय, नातेसंबंध, सुख इत्यादीं बद्दलच्या आपल्या जीवनातील स्वतःच्या स्वप्नांविषयी केलेल्या कल्पनांच्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करून अजना चक्राला उघडले जाऊ शकते.
 • ध्यान करताना मरवा, दिव्य मूळ, पचौलीचे अत्तर ( सुगंधरा ) इत्यादी आवश्यक तेलांचा वापर करावा. या प्रकारच्या गंध चिकित्सेचा तृतीय नेत्र उघडण्यासाठी उपयोग केला जातो.
 • जांभळा किंवा नीळ रंगाचा तसेच गडद निळ्या रंगाची रत्ने जसे नीलम (ऐमेथिस्ट – जांभूळ रंगाचा मौल्यवान खडा ), सोडालाइट, अॅझुराइट ह्यामुळे अजना चक्राचा समतोल राखला जातो.
 • सरळ वास्तुनुसार तुमच्या घरात बदल करा आणि दिशांच्या विज्ञानावर लक्ष केंद्रित करा.
 • गोष्टी जशा येतात तशा मोकळ्या मनाने स्विकार करा आणि सहजतेने त्या गोष्टींची कल्पना करा.
 • ओमेगा – 3 फॅटी अॅसिड तसेच प्रोटीनयुक्त भरपूर अन्नपदार्थांचे सेवन करा ज्यामुळे मेंदूची आकलन शक्ती वाढते. स्ट्रॉबेरीज, ब्ल्यू बेरीज, अक्रोड, सामन नावाचा तोंबूस पिवळ्या रंगाचा चरबीदार मासा यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.